👁 10 Views

पंढरपूर सिंहगडच्या दोन संशोधकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संशोधन निधी

 
संशोधनास निधी प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ.  कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्याहस्ते संशोधक प्रा. अमोल जगदाळे व प्रा. अंजली पिसे यांचे अभिनंदन करताना.

पंढरपूर: प्रतिनिधी, कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयामध्ये एम एच आर डी व एआयसीटीई यांच्या मार्गदर्शनाने इन्स्टिट्युट इनोव्हेशन काॅन्सील सुरू झाले असून आगामी काळामध्ये संशोधन व विकास तसेच विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारीत नवीन उद्योग यांना वाव मिळणार आहे. यांना चालना देण्यासाठी पंढरपूर सिंहगड मधील प्रा. अमोल जगदाळे आणि प्रा. अंजली पिसे या दोन संशोधकांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून संशोधन निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

महाविद्यालयाला मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामधून संशोधनास अर्थसाहाय्य देण्यासाठी सीड मनी या योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये एस. के. एन. सिंहगड अभियांञिकी महाविद्यालयातील प्रा. अमोल जगदाळे व प्रा. अंजली पिसे यांनी प्रस्ताव दाखल केले होते. सदर प्रस्ताव विद्यापीठ स्तरावर व बाहेरील स्तरावरून निवड करण्यात आली आहे.

    यावेळी प्रा. अमोल जगदाळे यांनी पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची सिस्टीम उभा करण्यासाठी संशोधन करणार असुन प्रा. अंजली पिसे या आय ओ टी या प्रगत संशोधनाच्या माध्यमातून चंद्रभागा नदिमधील पाण्याची गुणवत्ता व पाण्याचे संश्लेषण या क्षेत्रामध्ये संशोधन करणार आहेत. या संशोधन निधीमधून मुलभुत सुविधा महाविद्यालयांमध्ये तयार होणार असून याचा फायदा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांना होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून निधी प्राप्त केल्याबद्दल प्रा. अमोल जगदाळे आणि प्रा. अंजली पिसे यांचे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Advet.  


……………

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *