👁 11 Views

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांला “क्वाँलिशिया” कंपनीकडून वार्षिक ६ लाखाचे पॅकेज

 
 पंढरपूर : प्रतिनिधी:- कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील शुभम तांदळे या विद्यार्थ्यांची जगातील नामांकित “क्वाँलिशिया” कंपनीत कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

 ………….
Adv

………….

      अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात एक दबदबा निर्माण केला आहे. विद्यार्थ्याच्या हिताचे शिक्षण देऊन पालकांच्या विश्वासास पात्र असलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील विद्यार्थी विविध नामांकित कंपनीत इंटरव्हूवद्वारे निवडले जात आहेत.

     “क्वाँलिशिया” या कंपनीत सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील शुभम तांदळे या विद्यार्थ्याला कंपनीकडून वार्षिक ६ लाख रुपयांचे  पॅकेज मिळाले आहे. शुभम तांदळे या विद्यार्थ्यांची सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली आहे.

      “क्वाँलिशिया” या कंपनीत स्क्रिप्टलेस ऑटोमेशन प्लॅटफॉर्म वापरात आहेत. ऑटोमेशन, वेब, डेस्कटॉप आणि मोबाइल अनुप्रयोगांवर प्रयोग करण्यात येतात.

   शुभम तांदळे हा साॅफ्टवेअर डेव्हलपर म्हणून या कंपनीत काम पाहणार आहे. विविध कंपन्यांसाठी नवीन वेबसाईट, साॅफ्टवेअर तयार करण्याचे काम हि कंपनी करते.

  या निवडी दरम्यान कंपनी कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक व तांत्रिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीच्या अधिकारी समाधानी झाले. कंपनीत आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याकडे दिसून आले. या निवडीमुळे विद्यार्थी व पालक वर्गात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

        कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथील सेन्ट्रल प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पितांबरे, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. नामदेव सावंत, दिपक कोष्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *