👁 10 Views

नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट

पंढरपूर Live | 

1 जानेवारी 2021रोजी नववर्षाच्या प्रारंभ दिनी श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्रीविठ्ठल रखुमाई च्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. 

आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकुर यांनी ही सजावट करण्यासाठी एक टन फुले मंदिर समितीस दान दिली आहेत. झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध रंगीबेरंगी फुलांचा या सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.

या सजावटीतील विशेष आकर्षण म्हणजे फुलांमध्ये वारकरी सांप्रदायातील भजन साहित्य टाळ, मृदंग,  वीणा,  चिपळ्या यांचे छायाचित्र खुबीनं दर्शविण्यात आली आहेत. या चित्रांमुळं आजची ही सजावट अधिकच खुलून दिसत आहे.

………….
Adv


………….

पंढरपूर लाईव्ह च्या सर्व वाचक, दर्शक, हितचिंतक व जाहिरातदार बंधु भगिणींना नववर्षानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
– टीम पंढरपूर लाईव्ह 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *