👁 13 Views

पंढरीतील सुप्रसिध्द इडली व्यावसायिक मुन्ना रोकडे यांचे दुःखद निधन


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील इडली व्यवसाय करणारे कै. मनोज (मुन्ना) सुरेश रोकडे (वय 52), रा. चंद्रभागा घाट, पंढरपूर यांचे शनिवार दि ९ रोजी पहाटे २ वाजता दुःखद निधन झाले.




लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत ते “मुन्ना” या नावाने सुपरिचित होते. त्यांच्या त्यांच्या मुलाचे लग्न होवून तीनच दिवस उलटले असताना त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने विणे गल्लीसह पंढरपूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी व विवाहित मुलगा पत्नी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *