👁 14 Views

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पुतळ्याचं अनावरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा पार

 

Pandharpur Live Online : मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्याच श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत हे अनावरण पार पडलं. यावेळी पक्षीय मतभेद विसरून सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे त्याविषयी राजकीय चर्चा सुरू झाली होती. या दोघांनी एकत्रपणे नेतेमंडळींच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.


pagead2.googlesyndication.com

दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.

या कार्यक्रमास मंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छनग भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासंह राज्यातली सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व महाविकासआघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे भावूक….

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाले. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. काही काही क्षण असे असतात की ज्यावेळी आपण फार बोलू शकणार नाही. बाळासाहेब हे देशातील मोठे मार्गदर्शक होते. त्यांचे मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणारे आहे. बाळासाहेबांचे अनेक नेत्यांशी ऋणाणुबंध होते. आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो, अशी भावूक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.


pagead2.googlesyndication.com

ट्विटरवर अभिवादन

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृषीमंत्री दादा भुसे, भाजप नेत्या पंकजा मुंडे या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना ट्वीटरवर अभिवादन केलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *