👁 9 Views

पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

 

Pandharpur Live : पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवास मध्ये 200 बेडचे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे . संभाज शिंदे, साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे. भगीरथ भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी. तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, अमर पाटील उपस्थित होते.

             या कोविड केअर सेंटरमध्ये पंढरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील तसेच परिसरातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराची  सुविधा उपलब्ध आहे . वेदांत भक्त निवास मध्ये जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूरच्या वतीने 100 बेड तर व्हिडिओकॉन भक्त निवास मध्ये डीव्हीपी उद्योगसमूहाचे श्री विठ्ठल-रूक्मिणी कोविड केअर सेंटरचे 100 बेड सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारांबरोबरच आयुर्वेदिक काढा, योगासने, मनोरंजनात्मक खेळ,  चहा,  नाष्टा. जेवण अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा गरीब व गरजू रुग्णांना फायदा होणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे  पालन करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही श्री भरणे यांनी यावेळी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *