👁 9 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “उद्योगासाठी भांडवल कसे उभा करायचे” या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न

 


पंढरपूर: प्रतिनिधी 
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी ता. पंढरपूर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकांत अव्हाड यांचे “उद्योगासाठी भांडवल कसे उभा करायचे” या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. हा वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मध्ये श्रीकांत अव्हाड यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले. या वेळी बोलताना श्रीकांत अव्हाड म्हणाले कि, एंजल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय? एंजल इन्व्हेस्टमेंट किंवा व्ही सी चे फायदे व तोटे किंवा धोके, कायदेशीर पुर्तता, नियमावली व शेअर होल्डिंग कशी ठरवावी, इन्वेस्टर्स कसे शोधावेत, प्रेझेंटेशन कसे करावे, उद्योग उभा करत असताना भांडवल असावेच असे काही नाही. ते भांडवल कधी घ्यावे हे खुप महत्वपूर्ण आहे.

………………………..

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

“पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ……………………………..

उद्योग उभा करीत असताना बँकेकडून अथवा खाजगी गुंतवणूकदार या पैकी कोणाकडून आर्थिक मदत घ्यावी. भांडवल न भेटल्यास काय करावे. उद्योगाच्या दृष्टीकोनातून आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवावे या विषयी महत्त्वपूर्ण माहिती श्रीकांत अव्हाड यांनी ऑनलाईन वेबिनार मध्ये दिली.या ऑनलाईन वेबिनार मध्ये १३८ हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वेबिनार झाल्यानंतर श्रीकांत आव्हाड यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली

हा वेबिनार यशस्वीकरण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. रवींद्र टाकळीकर, प्रा. राहुल शिंदे, ई डी सी सेल व इतर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेबिनार सुञसंचलन व आभार प्रदर्शन डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *