👁 6 Views

Pandharpur | सत्ताधारी काळे गटाला धक्का ; विद्यमान संचालक अभिजीत पाटील यांच्या गटात


Pandharpur live news : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी सुरू असताना उपरी येथे कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब कौलगे आणि संचालक बिभीषण पवार यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केला.

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी सुरू असताना उपरी येथे कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब कौलगे आणि संचालक बिभीषण पवार यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केला. सुपली येथील डी. वाय. ॲग्रोचे बाळासाहेब यलमार, माजी संचालक, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, सहकार शिरोमणीचे मा.संचालक मधून गिड्डे, बाळासाहेब शेवाळे, आर. डी. पवार, बजरंग जाधव, गोपाळ तात्या झांबरे, कल्याणराव काळे यांचे कट्टर समर्थक संजय मधुकर गाजरे, देवानंद जगदाळे, आनंदा जगदाळे, श्रीमंत जाधव, जगन्नाथ लंगोटे, माणिक रामचंद्र गाजरे, आढीव येथील तंटामुक्ती अध्यक्ष नितीन चव्हाण यांनीही अभिजीत पाटील गटामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी विठ्ठलचे संचालक साहेबराव नागणे, दत्तनगर नागणे, पेटकर आप्पा नागणे, माणिक नागणे, अशोक जगदाळे, सदाशिव मुळे, ज्ञानेश्वर तात्या नागणे, भगवान नागणे, शहाजी जगदाळे, जयवंत नागणे, भीमराव गव्हाणे, पोपट आसबे, नवनाथ आसबे, बबन मोहिते, चंद्रकांत जाधव, कल्याण नागणे, गोरख नागणे, केशव सुरवसे तसेच प्रवीण नागणे सर भारत नागणे बजरंग नागणे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रश्नांची उत्तर देऊ शकतील का?
उपरी, सुपली, पळशी, शेळवे या गावातील पदािधकाऱ्यांनी सहकार वाचविण्यासाठी, त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, आपल्या सोबत काम करण्याची भूमिका घेत आपल्या पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सत्ताधारी ऊस बिल, कर्मचाऱ्यांचे देणे, पुढील हंगामात पैसे उपलब्ध कसे करणार या प्रश्नांची उत्तर देऊ शकतील का? असा प्रश्न अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *