👁 5 Views

सोलापूर शहराला एक दिवस  उशिरा पाणीपुरवठा

 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सोलापूर विभागाकडून १३२ के.व्ही/३३ के.व्ही मंद्रुप सबस्टेशनहून टाकळी हेड वर्क्सला ३३ के.व्ही उच्चदाब विद्युत पुरवठा अचानक बुधवारी खंडीत झाल्याने टाकळी वरुन पाण्याचा उपसा कमी झाला आहॆ. 

उजनी हेड वर्क्सला इंदापूरहून येणारे विद्युत पुरवठ्यामध्ये अनियमितता व कमी दाबाने झाल्यामुळे ३१ मे व दि.१ जून रोजी पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा होवू शकला नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार आहॆ.

टाकळी हेड वर्क्स व उजनी हेड वर्क्स येथून होणारा २ जून रोजीचा नियोजित पाणी पुरवठा एक रोटेशन पुढे जाणार आहे.

 तरी कृपया नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *