👁 8 Views

खळबळजनक… त्यानं स्वतःला पेटवून घेतलं आणि पेटलेल्या अवस्थेतच घुसला पोलिस आयुक्तालयात!


Pandharpur Live Online: पुणे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेत एकाने पेटलेल्या अवस्थेतच पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातू आयुक्तालयात धाव घेतल्याने एकच खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे या तरुणाचे नाव आहे. आज (बुधवार) सकाळी साडे आकरा वाजण्याच्या आयुक्तालयाच्या बाहेर स्वतः अंगावर पेटवून घेतले. पेटलेले अवस्थेतच व्यक्ती आयुक्तालयात शिरला. हा यामुळे एकच गोंधळ उडाला. गुन्हे शाखा आणि गेटवर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सुरेश पिंगळे हा तरूण काही कामासाठी आला होता. दरम्यान, त्याने अचानक रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या लक्षात येताच, लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान हा प्रकार घडल्याने आयुक्तालयात प्रचंड गोंधळ उडाला असून, या तरुणाने पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल असल्याने, पासपोर्ट रिजेक्ट करण्यात आला होता, त्यातून त्याने पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *