👁 12 Views

पूर्णत्वाच्या वाटेवर रामलल्लांचे श्रीराम मंदिर: अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर होणार इकोफ्रेंडली; एकाच वेळेस 5 लाख भाविकांना मिळणार दर्शन !

Pandharpur Live Online: जगभरातले रामभक्त ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ते अयोध्येतील रामलल्लांचे श्रीराम मंदिर पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. या मंदिराचा पाया उभारून झाला असून आता मंदिराच्या भिंती आणि सुशोभीकरणाचे कार्य वेगाने सुरू आहे. हिंदूंसह देशातील नागरिकांना प्रेरणा देणारे भगवान श्रीरामांचे हे भव्यदिव्य मंदिर डिसेंबर 2023 पासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. या मंदिरात दर्शनासाठी एकाच वेळेस पाच लाख भक्त आले तरी कोणतीही समस्या उद्भवणार नाही अशी पर्यावरणपूर्वक रचना मंदिराचे स्थापत्यकार करीत आहेत. या बाबींवर नुकतेच राम मंदिर निर्माण समितीच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 पासून रामभक्तांना गर्भगृहानजीक जाऊन रामलल्लांचे दर्शन घेता येणार आहे. 44 थरांचा मंदिराचा पाया उभारून पूर्ण झाला आहे. त्यासाठी 15 सप्टेंबर डेडलाइन ठेवण्यात आली होती, पण ते काम आधीच पूर्ण झाले आहे. आता राम चबुतऱयाचा ओटा उंच करण्याचे काम ऑक्टोबरअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. राम चबुतऱयासाठी मिर्झापूर येथून आणण्यात येणारे 4 लाख घनफूट दगड वापरण्यात येणार आहेत. राम मंदिर उभारण्याच्या कामातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येच्या सर्किट हाऊसमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र, महासचिव चंपत राय आणि अन्य विश्वस्तांच्या उपस्थितीत रविवारी विशेष बैठक पार पडली.


सामान्य स्थितीत अयोध्येच्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी एकाच वेळेस पाच लाख भाविक आले तर प्रत्येकाला किती वेळ रामलल्लांचे दर्शन घेता येईल याचे गणितही समिती बैठकीत करण्यात आले. शिवाय एवढय़ा प्रचंड गर्दीत भाविकांना कोणताही त्रास होऊ नये अशी पर्यावणपूरक मंदिर उभारणी आणि परिसर इकोफ्रेंडली करण्याबाबतचा आढावा बैठकीत मांडण्यात आला. मंदिराला दगड, परकोटा लावण्यासह संरक्षक भिंतींच्या उभारणीचे काम एकाच वेळेस करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक मंदिर परिसर उभा करण्यासाठी नामवंत पर्यावरण तज्ञांचा सल्ला मंदिर समिती घेत आहे.

……………



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *