👁 4 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये प्रथम वर्ष पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न पालकांची लक्षणीय उपस्थिती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाचा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. यावेळी पारंपारिक उद्घाटना ऐवजी तुळशीच्या रोपांचे रोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी पालक मेळाव्याचा उद्देश पालकांना सांगितला. पालकांनी ज्या विश्वासाने आपल्या पाल्यांना कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला त्याच विश्वासाला आज  विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील यशातून महाविद्यालयाने सार्थ करून दाखविले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी यश अपयशांचा विचार न करता अभियांत्रिकीचे कौशल्य आत्मसात करण्याविषयी सांगितले. यावेळी विद्यापीठाने घेतलेल्या प्रथम सत्रातील परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून संतोष सडेवाले व अंजली बळवंत हे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी प्रास्ताविकामद्धे उपस्थितांना कॉलेजची माहिती करून दिली व पालकांनी सुद्धा वेळोवेळी आपल्या पाल्याची चौकशी संबंधित प्राध्याकापकांकडे करून विद्यार्थाची शैक्षणिक हजेरी, प्रगति व परीक्षेतील मार्क्स आदिविषयीचा  आढावा घेणे गरजेचे आहे असे सुचविले. प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा. अभिनंदन देशमाने यांनी प्रथम वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. कॉलेजमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विभागाची माहिती त्यांनी पालकांना दिली. विद्यार्थ्यांच्या यशामागील महत्वाचा असणारा “कर्मयोगी पॅटर्न” याविषयीची विस्तृतपणे माहिती प्रा. एन. जी.तिवारी यांनी पालकांना दिली. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी पालक मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालक मेळाव्याच सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. प्रा. राहुल पांचाळ यांच्या आभार प्रदर्शनाने पालक मेळाव्याची सांगता झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *