Pandharpur Live: पंढरपूर येथील वैष्णव नगर, इसबावी येथे कु. मयुरी महादेव कांबळे (वय-19) या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता घडल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडून समजली.
समजलेल्या माहितीनुसार मयुरीने घरात कोणी नसताना घराची कडी लावून आत्महत्या केली. मयुरीच्या घरी भाऊ आणि आई असा परिवार असुन तीचे 12 वी पर्यंत चे शिक्षण पुर्ण झाले होते.
आज मयुरीनं अचानक असं अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या का केली? याचं गुढ कायम आहे. एक हुशार आणि गुणवान मुलगी म्हणुन इसबावी परिसरात ओळखल्या जाणा-या मयुरीनं अशाप्रकारे आपलं आयुष्य संपवल्याबाबत परिसरातुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात झाली असुन पोलीस अधिक तपास करत आहेत.




