👁 6 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज दुपारची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष श्री.सुधीरआबा भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live: ‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 18 सप्टेंबर 2021 रोजीची दुपारची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष श्री.सुधीरआबा भोसले यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.

यावेळी श्री.सुधीरआबा भोसले यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी विघ्नहर्ता श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.सुधीरआबा भोसले यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी हर्षद कोळी आदी उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *