👁 11 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “इलेक्ट्रोटेक” कार्यक्रम उत्साहात

Pandharpur Live 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑ


फ इंजिनिअरींग मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात “इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग स्टुडंट्स असोसिएशन” च्या माध्यमातून “इलेक्ट्रोटेक” कार्यक्रमाचे उद्घाटन काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. प्रदीप व्यवहारे, विद्यार्थी प्रतिनिधी संकेत तोडकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी केले. यादरम्यान काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. या मध्ये एकूण चार कार्यक्रम आयोजित केले होते. (१) ट्रेजर हंट मध्ये विजेते ओंकार सुरवसे, अनिकेत जगताप, ओंकार साळुंखे, साईनाथ काकरे व उप-विजेते वेदिका शेटे, कोमल भानवसे, ओंकार क्षीरसागर, अभिनय काकडे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित केले आहे. याच प्रमाणे (२) माइंड ब्लास्टर मध्ये विजेते रोहन देशमुख व उप-विजेते संदीप क्षीरसागर व (३) इलेक्ट्रिकल मास्टर्स मध्ये विजेते सुरज दुधाळ व उप-विजेते सुजित पिंजारी (४) बीजीएमआय गेम मध्ये विजेते अभी बनसोडे, संग्राम शिंदे, प्रसाद काशिद व सोमनाथ भोजने व उप-विजेते ओंकार सुर्यवंशी, प्रसाद इरकल, ऋतुराज तनपुरकर, कृष्णा भोसले अशा कुशल अणि पारंगत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देवून मान्ययवरांच्य हस्ते सन्मानित करण्यात आले.


  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी मारीया साळवी तर उपस्थितांचे आभार कुमारी प्राजक्ता उंबरकर यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *