👁 9 Views

स्वेरीत स्व.किरण लामकाने यांना श्रद्धांजली

स्वेरीत स्व.किरण लामकाने यांना श्रद्धांजली

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या किरण एकनाथ लामकाने यांचे काल अकस्मात निधन झाले. त्यामुळे स्वेरीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 


          प्रारंभी स्व.किरण लामकाने यांच्या प्रतिमेला स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा.धनराज डफळे यांनी स्व.किरण लामकाने यांची शैक्षणिक पार्श्वभूमी व त्यांच्यात असलेल्या विशेष गुणवत्तेवर प्रकाश टाकला. श्रद्धांजली पर भाषणात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘स्व. किरण लामकाने हे स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षापासून ते तृतिय वर्षापर्यंत वार्षिक परीक्षेत सतत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत (रँकर) असायचे. त्यांचे अंतिम वर्षाचे शिक्षण सुरू असतानाच कॉलेज मधील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत ‘भारत फोर्ज’ या नामांकित कंपनीत त्यांची निवड झाली होती. किरण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला असून दु:खात स्वेरी परिवार सहभागी आहे.’ त्यानंतर दोन मिनिटे सर्वांनी मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. स्व.किरण यांच्या अकाली निधनाने शेगाव दुमाला (ता.पंढरपूर) व स्वेरी कॅम्पस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *