👁 5 Views

सोलापूर येथील गोरक्षकांनी वाचवले ७ गोवंशियांचे प्राण !

Pandharpur live news : सोलापूर १८ जून (वार्ता.) – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय असलेले वाहन पकडले.

वाहनाची पहाणी केली असता ७ गोवंशियांना दाटीवाटीने क्रूरपणे कोंबून भरल्याचे निदर्शनास आले. गोरक्षकांनी वाहनचालकाकडे चौकशी केली असता चालकाने संबंधित गोवंश कत्तलीसाठी समीर सौदागर यांच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. प्राण वाचवण्यात आलेल्या सर्व गोवंशियांना पोलिसांच्या साहाय्याने अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले. बजरंग दलाचे गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी यांनी ही कारवाई विश्वविख्यात संत प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या जन्मदिनी त्यांच्या पुण्यकार्याला समर्पित करत असल्याचे सांगितले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे शहर अध्यक्ष अविनाश कैय्यावाले, तसेच गोरक्षक सर्वश्री पवनकुमार कोमटी, सतीश सिरसिल्ला, वीरू मंचाल, पवन बल्ला, सूरज भोसले आदींचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *