👁 12 Views

स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात



स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

डिप्लोमाचा प्रवेश आता झाला सोपा, फक्त दहावीच्या आसन क्रमांकावर करता येणार रजिस्ट्रेशन

पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) ला मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०२ जून २०२२) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया गुरुवार, दि. ३० जुन, २०२२ पर्यंत चालणार आहे. दहावीच्या निकालापूर्वीच डिप्लोमा प्रवेशाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना फक्त आपल्या दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. दहावी परीक्षेच्या आसन क्रमांकासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या हायस्कूलशी संपर्क साधावा.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली. 



      सन २०२२-२३ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून स्वेरी पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. ‘पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १५ वे वर्ष असून या  महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. रजिस्ट्रेशनची ही प्रकिया दि.०२ जून २०२२ पासून ते दि. ३० जुन २०२२ (सायं ५:००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा.’ असे आवाहन देखील केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर दि.०३ जुलै २०२२ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस. गायकवाड (मोबा.क्र. ९८९०५६६२८१) व प्रा. एम्. एम. मोरे (९४२१९६०२५८) यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ अभ्यासक्रमांना मिळालेले एनबीए मानांकन, महाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्ड, गेली सलग पाच वर्षे शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी महाविद्यालय आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *