👁 11 Views

स्वेरीच्या २ विद्यार्थ्यांची ‘स्कुटस इंडिया’ या कंपनीत निवड



पंढरपूरः ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्कुटस इंडिया’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीतून दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून ‘स्कुटस इंडिया’ ही कंपनी स्वेरीचे माजी विद्यार्थी अजित रोडे यांनी स्थापन केली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

        पुणे येथील ‘स्कुटस इंडिया’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून नितिन तात्या एकमल्ली व विशाल अंकुश गंगथडे या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरीमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वेरी मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या  आकडेवारीवरून दिसून येते. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व  मोठमोठ्या कंपन्यांना अपेक्षीत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून प्रशिक्षित केले जाते. मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असताना देखील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तब्बल ६०० पेक्षा अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



 अभिमानाची बाब म्हणजे ‘स्कुटस इंडिया’ ही कंपनी स्वेरी अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून २०१४ साली उत्तीर्ण झालेले अर्थात स्वेरीचे माजी विद्यार्थी अजित रोडे यांनी स्थापन केलेली असून ते या कंपनीचे संचालक आहेत.  या कंपनीत प्रत्येक वर्षी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी ते अग्रेसर असतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेवून दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतः कंपनीची निर्मिती करून त्यात इतर होतकरु विद्यार्थ्यांना सामावून घेवून विकास साध्य करणे हा स्वेरीतील विद्यार्थ्यांचा दूरदर्शी विचार या स्वावलंबी धोरणावरून स्पष्ट दिसतो. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ‘स्कुटस इंडिया’ कंपनीत निवड झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *