👁 11 Views

‘सिंहगड’ पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ‘प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग्स युजींग रेवीट’ या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.*


एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागमध्ये तृतीय वर्ष मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग्स युजींग रेवीट’ या विषयावर आधुनिक पध्दतीचे रेवीट हे सॉफ्टवेअर वापरुन स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे प्रारूप त्रिमितीय (3D) आराखडे तयार करण्याविषयीची आणि सध्याच्या बदलत्या काळानुसार “बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM)”, या संकल्पनेला समजून घेण्यासाठी सदर साप्ताहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती व ती यशस्वीपणे संपन्न झाली असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी  विभागाचे प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.


   हि कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या प्रकल्पाधारीत शिक्षण या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक प्रा. गणेश लकडे यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत एकूण १२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.


या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना फोर डायमेंशन (4Dimension), पुणे येथील तज्ञ व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. पराग देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.


सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश लकडे यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *