👁 10 Views

स्वेरी फार्मसीला माजी विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन




पंढरपूर– सध्या मोठमोठ्या कंपन्यात व मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत  असलेले क्लिनिकल रिसर्च असोसिएट ऍट सिनेरजन बायो, पुणे चे रणजितसिंह चौगुले, सोहेल इनामदार, स्वराज जेनेरिक मेडिसिनचे संचालक सौरभ गोरे व कोव्हान्स डेटा अॅनालीस्ट चे अक्षय पाटील या स्वेरीच्या चार माजी विद्यार्थ्यांनी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीला सदिच्छा भेट दिली. भेटीनंतर त्यांनी फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात फार्मसी मध्ये करिअर करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन करून अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली.


         महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे उच्च पदभार स्वीकारल्यानंतर मिळत जाणाऱ्या उत्तुंग यशाकडे पाहिले असता पुर्वी जिथे आपण शिक्षण घेतले ते आपले महाविद्यालय आणि आपले गुरुजन वर्ग डोळ्यासमोर येतात. त्यामुळे त्यांच्या आठवणीने पावले आपोआप महाविद्यालयाकडे वळतात. कितीही मोठे पद प्राप्त झाले तरी  महाविद्यालयात पुन्हा जाऊन थोडा वेळ का होईना विद्यार्थी बनावेसे वाटते. अशाच भावनेतून  स्वेरी फार्मसीमधून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्वेरी फार्मसीला नुकतीच सदिच्छा भेट दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचा  वाढत असलेला वटवृक्ष, सुरुवातीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यात झालेला जमीन अस्मानाचा फरक पाहून चारही माजी विद्यार्थी आनंदून गेले. स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीची माजी विद्याथी संघटना ही नेहमीच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी लागणारी तयारी याबाबत नेहमीच माहिती देत असतात.


 विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सध्याच्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन होत असते. अधिकारी रणजितसिंह चौगुले यांनी प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ‘औषध निर्माण’ क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मुलाखती देताना कोणती काळजी घ्यावी? मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी?, क्लिनिकल रिसर्च मध्ये नेमक्या कोण-कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते? करिअरसाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? ‘व्यक्तिमत्त्व विकास’ होण्यासाठी संपर्क, संभाषण, व्यवहार कौशल्य, जागरूकता व  अद्ययावत माहिती या संबंधित विषयांवर  सखोल मार्गदर्शन केले. सोहेल इनामदार यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘जी पॅट’ आणि ‘नायपर’ या फार्मसी क्षेत्रातील महत्वाच्या स्पर्धा परीक्षांबद्दल विशेष मार्गदर्शन केले आणि यांची तयारी करताना येणाऱ्या अडचणीं विषयी सविस्तर चर्चा केली. सौरभ गोरे यांनी ‘मेडिकल व्यवसायाबाबत कोणती काळजी घ्यावी जेणेकरून रुग्ण व डॉक्टर यांच्यातील संबंध अधिक सुधारतील या व अन्य बाबीं विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘फार्माकोव्हिजिलन्स या नवीन विभागात फार्मासिस्टना उपलब्ध संधी’ याबाबत माहिती दिली. या प्रसंगी माजी विद्यार्थी सुरज बनसोडे हे देखील उपस्थित होते. यावेळी स्वेरीज कॉलेज ऑफ बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन  मणियार तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *