👁 11 Views

पंढरपूर : चौथ्या माळेनिमित्त रुक्मिणी माता सजली सरस्वती मातेच्या रुपात

काल शारदीय नवरात्रीचा चौथ्या माळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेला सरस्वती मातेचे बैठे रूप साकारण्यात आले होते.


सरस्वती मातेच्या रूपात सजवताना रुक्मिणी मातेला नवरत्नांचा हार, जडावाचे बाजूबंद जोड, खाद्याची वेणी , तन्मणी, दशावतारी हार, मोर जोड, ठुशी, शिंदे सरकार हार परिधान करण्यात आला होता.

सोन्या मोत्याची तानवड जोड, चंद्र, मोत्यांचा कंठा , बाजीराव गरसोळी , मण्या मोत्याच्या पाटल्या जोड , मोत्यांचे मंगळसूत्र, रूळ जोड, तारा मंडळ , कर्णफुले जोड, मोठी नथ , सोन्याची ठुशी , बाजूबंद , शिंदेशाही ठुशी , हिरवी पाचूची चिंचपेटी अशा तब्बल 22 पारंपरिक रत्नजडीत दागिने परिधान करण्यात आले होते.

रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी नेसविण्यात आली असून तिला बैठे रूपात दाखवण्यात आले होते.


रुक्मिणी मातेच्या मागे मोरपंख ठेवण्यात आले होते.

आज विठुरायाला देखील 18 प्रकारच्या विविध हिरे मोत्यांच्या अलंकाराने सजवण्यात आले होते.


नवरात्री निमित्त हिरेजडित विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *