👁 7 Views

बार्शी; भयंकर! ज्या विहिरीत पहिल्या पत्नीनं दोन चिमुकल्यांसह जीवनं संपवलं, त्याच विहिरीत दुसऱ्या पत्नीनंही दोन बाळासह जीव दिला

 बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात एका महिलेने आपल्या चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीय.

काल दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे याच विहिरीत पहिल्या पत्नीने देखील दोन मुलींनी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या पत्नीने देखील केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


अवघ्या 22 वर्षाच्या रोहिणी उर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद यांनी आपल्या दीड वर्षाचा मुलगा अनिश बाबासाहेब काशीद आणि चार महिन्यांची चिमुरडी अक्षरा बाबासाहेब काशीद यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. अथक प्रयत्नानंतर काल संध्याकाळी या तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

धक्कादायक बाब म्हणजे बाबासाहेब काशीद यांच्या पहिल्या पत्नीने याच विहिरीत आपल्या चिमुकल्याना सोबत घेऊन जीवन संपवले होते. बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद हिने अवघ्या तीन वर्षाची मुलगी अक्षरा आणि पाच वर्षाची मुलगी आदिती या दोघींना स्वतःच्या कमरेला साडीने बांधून घेत २७ जुलै २०१७ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर बाबासाहेब काशीद यांनी रोहिणी दुसरा विवाह झाला होता.

बाबासाहेब याने विवाहनंतर पहिल्या पत्नीचे नाव अनुराधा रोहिणी यांना ठेवले. विवाहानंतर रोहिणी उर्फ अनुराधा हिला फेब्रुवारी 2020 मध्ये अनिष हा मुलगा झाला. त्यानंतर 16 जून 2022 रोजी चार महिन्यांपूर्वी दुसरी मुलगी झाली आणि तिचे नामकरण पहिल्या पत्नीच्या मुलीप्रमाणेच अक्षरा असे केले. काल दुपारी रोहिणी उर्फ अनुराधा यांनी स्वतःच्या कोवळ्या दोन चिमुरड्यांना घेऊन विहिरीत उडी मारत आपलं आयुष्य संपवलं.


या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोटार लावून विहिरीतील पाणी कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र पाणी जास्त असल्याने त्यात कोणतेही यश आले नाही. त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचरण केली. अथक प्रयत्ननंतर संध्याकाळी या तिघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. या घटनेची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अशी माहिती तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *