👁 7 Views

मंगळवेढा; खळबळजनक प्रेमसंबंधातून महिलेस घराबाहेर ओढून पाईपणे धो- धो धुतले

 प्रेमसंबंधातून घरी येवून तु माइयाशी संबंध का ठेवत नाही असे म्हणून एका महिलेला केबलने व प्लास्टिकच्या पाईपने घराबाहेर ओढून बेदम मारहाण केल्याची घटना

मंगळवेढा शहरापासून काही अंतरावर घडली असून याप्रकरणी राहुल घाडगे (रा.आंबे ता.पंढरपूर) व इतरांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत महिला व आरोपी राहूल घाडगे यांचे प्रेमसंबंध होते. तो सारखा घरी ये जा करीत होता. रात्री 9.15 वा. आरोपी व इतर अनोळखी लोकांना घरी घेवून आला व

पिडीतेस तु माइयाशी संबंध का ठेवत नाही असे म्हणून पिडीतेस केबलने व प्लास्टिकच्या पाईने घराबाहेर ओढून बेदम मारहाण केली.

या भांडणाचा आवाज ऐकून एक 50 वर्षीय महिला सोडवा सोडवी करण्यास गेली असता सर्व आरोपीनी तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घाणघाण शिवीगाळ केली

व जाताना तुला मी जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


सदर घटनेनंतर पिडीत महिला ही लगेच तक्रार करण्यास आली नाही. दि.27 सप्टेंबर रोजी आरोपी राहुल घाडगे याने पुन्हा घरी येवून शिवीगाळ केल्याने दोघी महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या.

दरम्यान जखमी महिलांना पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

याचा अधिक तपास शहर बीटचे पोलिस हवालदार हजरत पठाण हे करीत असून त्यांनी शहरापासून काही अंतरावर असलेल्या घटनास्थळाला भेट देवून घटनेचा पंचनामा केल्याचे सांगण्यात आले.







Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *