👁 9 Views

रश्मीका अजूनही गुंतलीय जुन्या नात्यात म्हणाली, त्याचं लग्न झालंय, पण…

 रश्मिका मंदाना दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांपेक्षा अधिक नेहमीच तिच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली दिसून येते.

लोक तिच्या एका स्माईलवर जीव ओवाळून टाकताना दिसतात. सध्या रश्मिका आपल्या नव्या बॉलीवूडच्या सिनेमामुळे चर्चेत पहायला मिळतेय. याच सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं गेली असताना रश्मिकानं काही पर्सनल गोष्टी देखील शेअर केल्या आहेत.

ती अजूनही आपल्या एक्स बॉयफ्रेंडला भेटते,त्यासाठी काही कारणच असावं असं नाही असं सांगतानाच आमच्यात अजूनही चांगलं नातं आहे असं म्हणून गेली रश्मिका. आणि बस्स चर्चेला उधाण आलं. याचवेळी रश्मिका म्हणाली,”प्रेमाचं नातं तुटल्यानंतरही आमच्यात मैत्रीचं नातं इतकं चांगलं टिकून राहिलंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही


रश्मिका लवकरच ‘गूडबाय’ या सिनेमातून बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करतेय. रश्मिकाला या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत विचारलं गेलं की,’जर एखाद्या पार्टीत तुला तुझा जुना बॉयफ्रेंड भेटला तर तुझी रिअॅक्शन काय असेल?’ तेव्हा तिनं ‘नमस्ते’ असं उत्तर दिलं. पुढे ती म्हणाली,”माझ्या एक्ससोबत माझी अजूनही चांगली मैत्री आहे. मी त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांना भेटणंही पसंत करते”. एवढ्यावरच रश्मिका थांबली नाही तर तिनं हे स्विकारलं की,”खरंतर त्याचं लग्न झाल्यानंतर मी त्याला भेटणं ही चांगली गोष्ट नाही पण आमच्यात मैत्रीचं खूप चांगलं नातं आहे, पण मग हे देखील चांगलंच आहे नाही का”.




Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *