👁 6 Views

शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजिती

 अनेकदा आपण सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ पाहिले आहेत. कधी सिंह तर कधी चित्ता, तर कधी वाघ, आणि कधी कधी माकडाने केलेली फजेती.


रोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ अपलोड होतात आणि व्हायरल होतात. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण अनेकदा पाहिले आहे की, माकडाने वाघ, सिंह किंवा चित्त्याची फजीती केली आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माकड आणि वाघाचा आहे. ज्यामध्ये माकडाने वाघाची चांगलीच फजीती केली आहे. तुम्ही जर व्हिडीओ पाहिला तर लक्षात येईल की, माकडाने अक्षरश: वाघासोबत मस्ती केली आहे. माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू शकतो मात्र वाघ नाही आणि हीच गोष्ट वाघाला दुखवते.


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड झाडावर बसलेले दिसून येत आहे आणि एक वाघ त्याची शिकार करण्यासाठी झाडावर चढतो. वाघाला आपल्या दिशेने येताना पाहून माकड एका कमकुवत डहाळीला धरून लटकले तर वाघही तीच डहाळी पकडण्यासाठी पुढे सरकतो. संधी पाहून माकड दुसऱ्या फांदीवर उडी मारते आणि वाघ तिथेच अडकतो. थोड्या वेळानंतर वाघ झाडावरून खाली पडतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *