👁 9 Views

देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला , अपघातात पाच जणांचा मृत्यू

 दगीर (जि.लातूर) : उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे मंगळवारी सकाळी ८.३० वाजता भीषण अपघात झाला.


या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून, बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारमधील मयत पाच जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.



उदगीर आगाराची बस क्रमांक एमएच २० बीटी १३७५ मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता आगारातून चाकूरकडे रवाना झाली. दरम्यान, बस हैबतपुर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार क्रमांक एमएच २४ एबी ०४०८ बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचजण जागेवरच ठार झाले. तर बसमधील दहा जण जखमी झाले असून, त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *