👁 7 Views

आई- मुलीचे एकास मुलाशी संबंध, आधी प्रेम , मग घरी बोलावले आणि मृत्यु….

 मुंबई : आपल्यासमोर अनेकदा अशा काही गोष्टी येतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील फार कठीण होऊन बसते. हल्लीच दक्षिण कोलकाता यथून एक बातमी समोर आली आहे, ज्याने सगळ्यांनाच हादरवलं आहे.


खरंतर प्रेमात आणि लढाईत सगळं माफ असतं असं म्हणतात. परंतू या त्रिकोनी प्रेमात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की, कायद्याच्या नजरेत काहीही माफ नाही. खरंतर दक्षिण कोलकाता येथील हरिदेवपूर येथून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुण अयानचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, अयानची गेल्या 7 वर्षांपासून एका मुलीशी ओळख होती.



यासोबतच त्यांच्या भेटीची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. अनेकदा दोघेही एकमेकांच्या घरी जात असत. अयानच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दशमीच्या रात्रीही अयानला त्या मुलीचा फोन आला, ज्यामुळे तो त्याच्या घरी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही.



अयानच्या वडिलांचा असा दावा आहे की अयानचे त्याच्या मैत्रिणीच्या आईसोबतही संबंध होते. अयान जस जसा या मुलीच्या घरी येत राहिला त्याची ओळख या मुलीच्या आईशी देखील झाली. ज्यानंतर आई-मुलगी दोघेही प्रेमावरुन भांडायचे असं देखील म्हटलं जात आहे, ज्यामुळे अयानचा मृतू झाल्याचा दावा आहे. परंतू पोलीस सध्या या दाव्याची चौकशी करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *