👁 6 Views

सोलापुरात ट्रॅफिक पोलिसाचं धक्कादायक कृत्य

 सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.


पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोलापूर शहरात आधीच वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील ट्राफिक विभाग वाहतुकीबाबत कोणतेही धोरण राबवत नाही.



शहरातील प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत असतात. अनेकदा लोक नियमाप्रमाणे दंड भरण्याऐवजी चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वाहन चालकाला तिथे उपस्थित असलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले.

नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाची माहिती दिली. मात्र, शेवटी चिरीमिरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आलं. आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली.

मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले आणि वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला. मग डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही ट्राफिक विभागातील काहीजण चिरीमिरी घेत असल्याचं समोर येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *