👁 6 Views

गर्लफ्रेंडसाठी’ तो, दुकानात शिरला दुकानदारावर केला चाकूहल्ला

 प्रेमात फार वेळा काय होते? प्रेम तिच्यावर करायचं आणि घराभोवती फिरायचं’, अशी कवी इंद्रजित घुले यांची कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.


प्रेमावर अनेक मजेशीर कविता आहे. प्रेमात तरुण-तरुणी काहीही करु शकतात. अनेकजण प्रेमात प्रचंड वेंधळे होतात. आपण काय करतोय याचंदेखील भान त्यांना शिल्लक राहिलेलं नसतं.

प्रेमात आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी वेगवेगळे गिफ्ट आणि सरप्राईज देणं काही वाईट नाही. आपला जोडीदार खूश व्हावा यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं काहीच वाईट नाही. पण त्यातून हिंसक आणि अराजकतेच्या मार्गावर जाणं वाईट आहे. आपल्या प्रेमसंबंधांमुळे कुणाला त्रास होणार नाही, असंच वागलं पाहिजे. पण काही विचित्र लोक तसं काही करतात आणि मग त्यांना त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची नामुष्की ओढवते.



तशीच काहिशी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. ‘तेरे प्यार के लिए कुछ भी करेंगे’, होय, नक्कीच! याच वाक्याप्रमाणे शहरात एक घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरामध्ये आपल्या गर्लफ्रेंडला दुकानदाराने 2 हजार रुपये दिले नाही म्हणून बॉयफ्रेंडने चक्क दुकानदारावर चाकूने हल्ला केला.

त्यामुळे आता शहरात कोणत्या गोष्टीवरून कोणता गुन्हा घडेल याचा नेम राहिलेला नाही. झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळख असलेलं आता गुन्हेगारी झपाट्याने वाढणारे शहर म्हणून या घटनांनी नवीन ओळख होऊ पाहते आहे.

बॉयफ्रेंडने किराणा दुकानदारावर चाकू हल्ला केल्याची घटना औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरात घडली आहे. मुकुंदवाडी परिसरातील स्वराज नगर भागातील सुनिता चौथमलचा बॉयफ्रेंड सौरभ नागराळे याने संजय धर्मे यांच्या किराणा दुकानावर जात सुनिताला दोन हजार रुपये का दिले नाही म्हणत संजय धर्मे यांच्या डाव्या खांद्यावर आणि हातावर चक्क चाकूने वार केले. या संपूर्ण प्रकाराविषयी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आलाय. त्यानुसार मुकुंदवाडी पोलीस तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *