👁 7 Views

मुलीवर बलात्कार करून फरार झालेला तरुण जेरबंद

 वाई तालुक्यातील धोम धरणाच्या जवळ असलेल्या निर्जनस्थळी वाई तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून दोन दिवसांपासून आरोेपी फरार होता


.
संशयित आरोपीचे नाव आकाश प्रवीण पोळ (वय 22, रा. धोम) असून तो (कुडाळ ता. जावळी) येथे एका वेल्डिंगच्या दुकानांमध्ये लपून बसला होता. या संदर्भामध्ये वाई पोलीस ठाण्याचे तपासणी अधिकारी सपोनी रवींद्र तेलतुंबडे यांना सुगावा लागताच 24 तासांच्या आत नराधम आकाश पोळ याला आज सकाळी सातच्या सुमारास जेरबंद केले. आरोपीवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीच्या दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश पोळ याचा वाढदिवस असल्याने त्याने पीडित अल्पवयीन मुली आपण फिरायला जावूया असे सांगून फिरायला घेवून गेला.

 आरोपीने तिला गणपती घाटावरुन दुचाकीवर बसवून धोम धरणाच्या जवळ असलेल्या निर्जनस्थळी घेवून गेला. तेथे तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, असा इशारा दिला होता. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे करत अखेर वाई पोलिसांना नराधमास पकडण्यास यश आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *