👁 9 Views

एकतर्फी प्रेमातून फेकले महिला होमगार्डवर ॲसीड

 र्धा : रामनगर पोलिस ठाण्याला लागूनच असलेल्या महावीर गार्डनमध्ये आज गुरुवारी (ता. १३) रात्री ७.३०च्या सुमारास एका महिला होमगार्डवर तिच्या पुरुष सहकाऱ्याने ॲसीड फेकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.


यावेळी तेथे उपस्थित लोकांनी आरोपी पुरुष होमगार्डला पोलिसांच्या हवाली केले.

पीडित महिला ही ४० वर्षांची असून ती होमगार्डमध्ये सेवारत आहे. आरोपी होमगार्ड अर्जुन चाफले (वय ५०) हासुद्धा होमगार्डमध्येच आहे. पीडिता गार्डनमध्ये असताना अर्जुन तेथे आला व त्याने महिलेवर पाठीमागून ॲसीड फेकले


 ॲसीड अंगावर पडताच महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे गार्डनमध्ये असलेले नागरिक धाऊन आले व त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले आहे.


फेकलेले ॲसीड बाथरूम साफ करणारे ॲसीड असल्याचे सांगितले जात असून पीडित महिलेला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *