👁 13 Views

शालिनचे हे गैरवर्तन पाहून भाईजानचा पारा चढला

 मुंबई : बिग बॉस 16 चांगलेच असून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. मात्र, यादरम्यान शालिनमुळे मोठा वाद निर्माण झालाय.


बिग बॉसच्या घराच चेक करण्यासाठी आलेल्या डाॅक्टरसोबत शालिनने गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट निर्माण झालीये. त्यामध्येच आता सलमान खानने देखील शालिनचा चांगलाच समाचार घेतलाय. इतकेच नाही तर रागामध्ये सलमानने आपले जॅकेट देखील काढून टाकले. शालिन सलमान खानला बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी सलमान त्याला म्हणतो की, मला शर्ट काढण्याची वेळ नको येऊ देऊ तू, काहीच बोलू नकोस.


बिग बॉसच्या मंच्यावर सलमान खान शालिनवर प्रचंड चिडल्याचे दिसत आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान खान शालिनचा क्लास घेताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शालिन तीन टाईम चिकन खाण्यासाठी मागतोय. तसेच बिग बॉसने सर्व घरातील सदस्यांसाठी चिकन पाठवले असूनही शालिन सर्वांना सांगतोय की, फक्त आणि फक्त माझ्यासाठीच बिग बॉसने चिकन पाठवले आहे आणि तो मी एकटाच तीन वेळा खाणार आहे. माझ्या हेल्थसाठी डाॅक्टरांनी मला चिकन खायला सांगितल्याचे शालिन म्हणतो.

बिग बॉसच्या घरात शालिन इतर सदस्यांना बिग बॉसने दिलेले चिकन खाऊ देत नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. माझ्या हेल्थसाठी मला चिकन बिग बॉसने दिले असे शालिन खोटे सांगत होता. यावर बिग बॉसने देखील शालिनला समजवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिग बॉसने शालिनचे हेल्थ चेकअप करण्यासाठी घरामध्ये एका डाॅक्टरांना पाठवले. मात्र, यावेळी शालिनने डाॅक्टरांसोबत चुकीचा व्यवहार करत. त्यांची पदवी मागत त्यांना चुकीच्या काही गोष्टी बोलल्या.


शालिनने ज्यापध्दतीने डाॅक्टरांसोबत व्यवहार केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून शालिनविरोधात संतापाची लाट निर्माण झाली. शालिनने स्वत:ची चोरी लपवण्यासाठी डाॅक्टरांसोबत गैरवर्तन केले आणि हेल्थ चेकअप देखील करू दिले नाही. याचप्रकरणात सलमान खानने देखील शालिनचा चांगलाच क्लास घेत म्हटले की, कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी लोकांचे प्राण वाचवले आणि तू त्यांच्यासोबत असा व्यवहार करतोय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *