👁 5 Views

पगार नाही मिळाला तर काय कराल ? कर्मचाऱ्यांनी जे केलं त्याने सगळे चकित

 मालकाने पागर दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. सांगली जिल्ह्यातील्या विटामध्ये घडलेल्या या अजब चोरीप्रकरणी सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.


दोघा चोरट्यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. विटा पोलिसांनी  या चोरीप्रकरणी धडक कारवाई केली. 8 लाखापेक्षाही जास्तीची चोरी दोघांनी केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय.


सांगलीतील विटामध्ये सध्या एका अजब चोरीची चर्चा जोरात रंगलीय. 9 ऑक्टोबरला शिवाजी नगर इथं असलेल्या जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये चोरी झाली होती. या चोरीमुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये दहशत पसरली होती. तर संपूर्ण विटामध्ये खळबळ उडाली होती.


चोरट्यांनी जिओ मार्ट ऑनलाईन सेंटर दुकानाचं शटर फोटलं होतं. त्यानंतर सेंटरच्या आत प्रवेश करुन तब्बल 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेत तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची रोकडही लंपास केली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *