👁 6 Views

दारू उधार न देणाऱ्या बार चालकांच्या खुनाचा प्रयत्न

 पुणे – दारू उधान न दिल्यावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी बार चालकावर कोयत्याने हल्लाकरत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नर्हे परिसरात घडली. तर, कोयते हवेत फिरवून दहशत माजवत बसलेल्या ग्राहकांना शिवीगाळ केली. 


    त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात श्रीकांत थोपटे (वय ३५) व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुरण्णा तावरखेड (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे.


    ही घटना नर्हेतील लक्ष्मी बार अँड रेस्टॉरंट येथे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी तीन दिवसांपुर्वी दारू पिण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी उधारीवर दारू मागितली. 


    त्यामुळे गुरण्णा यांनी उधार दारू देण्यास नकार दिला. याचा राग आरोपींच्या मनात होता. दुसऱ्याच दिवशी आरोपी त्याठिकाणी कारमधून गेले. त्यांनी हातात कोयते घेऊनच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला व तक्रारदार यांच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वारकरून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या ग्राहाकांना शिवीगाळ करत मोठा गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *