👁 6 Views

सोलापूर: दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले

 


सोलापूर: दहिहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाचजणांनी मिळून तरुणाला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. बापूजी नगरात दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्लेसबर्ट अलषर्ट भालेकर (वय- २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. यातील जखमी ब्लेसबर्ट भालेकर हा तरुण बापूजी नगरात वास्तव्यास आहे. दहिहंडीच्या कार्यक्रमात त्याचे विनोद गड्डम, विकास गड्डम यांच्याशी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी विनोद व विकासने अन्य तिघांच्या सहकार्याने दुपारी साडेचारच्या सुमारास त्या घराजवळ गाठले. लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत ब्लेसबर्ट याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सर्वांगास मुका मार लागला. त्याच्यावर उपचारासाठी भाऊ लिबर्ट याने शासकीय रुग्णालय गाठून उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. रुग्ण शुद्धीवर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *