👁 8 Views

फरार गुन्हेगाराची निर्घृण हत्या, दुचाकी धडक देत धारदार शस्त्राने वार

 किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंतीला लागून मुख्य सिंहगड रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास फरार सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ऋषिकेश तांबे (वय अंदाचे 30,रा.गोळेवाडी, डोणजे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात अनेक गंभी गुन्हे दाखल आहेत.


काही दिवसांपूर्वी डोणजे येथील एका तरुणावर जीवघेणा हल्ला करुन तो फरार झाला होता.

आज पहाटेच्या सुमारास ऋषिकेश तांबे हा डोणजे बाजू कडून पुणे बाजूकडे दुचाकीवरुन जात असताना अगोदर त्याच्या दुचाकीला अज्ञात हल्लेखोरांनी मागून धडक दिली व त्यानंतर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. यात ऋषिकेश तांबे याचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.


सकाळच्या वेळी मुख्य रस्त्यावर मृतदेह पडलेला पाहून काही नागरिकांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली. तातडीने हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, निरंजन रणवरे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपासासाठी पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिली आहे.


“मृत तरुण हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला होता. अद्याप ही हत्या कोणी केली याबाबत माहिती मिळालेली नाही, परंतु पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता आहे. तपासासाठी पथके रवाना करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.” सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *