👁 8 Views

हवेत फुटबॉलसारख उडवून उडवून घेतला जीव, म्हशीने सिंहाला दिलेला भयानक मृत्यु

 सिंह म्हणजे जंगलाचा राजा. ज्याला जंगलातील कित्येक प्राणी घाबरतात.

सिंहाला तुम्ही शिकार करतानाही पाहिले असेल. सिंहाच्या शिकारीचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण तुम्ही सिंहाची शिकार होताना कधी पाहिलं आहे का? असाच धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.



म्हशींनी सिंहाला भयानक मृत्यू दिला आहे. जंगलातील म्हशींनी सिंहाच्या पिल्लावर भयानक हल्ला केला आहे. शिंगांनी त्याला फुटबॉलसारखं हवेत उडवत त्याचा जीव घेतला आहे. हा व्हिडीओ पाहूनच हैराण व्हाल.


सिंहाची अशी अवस्था पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शिकार करणाऱ्या सिंहाचा सर्व राग म्हशी या सिंहाच्या पिल्लावर काढत आहेत, असंच या व्हिडीओतून दिसून येतं. 

व्हिडीओत तुम्ही पाहाल सुरुवातीला म्हशींचा कळप दिसत आहे. इतक्या या कळपातून एक प्राणी अचानक हवेत उडताना दिसतो.



हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर सिंह आहे. सिंहाचं पिल्लू आहे. म्हशी त्या पिल्लाला एकएक करत हवेत उडवत आहेत. कधी पिल्लू इकडे, तर कधी तिकडे.


सिंह असो वा त्याचं पिल्लू, त्याला असं आपण कधीच पाहिलं नाही आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पिल्लाची अशी अवस्था पाहवत नाही आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *