👁 5 Views

विवाहित महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

 सांगली: जत तालुक्यातील सिंदूर येथे एका विवाहित महिलेने दोन मुलासह आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.


जत तालुक्यात गेल्याच आठवड्यामध्ये दोन मुलीसह एका महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर हा दुसरा प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.


सिंदूर येथील लक्ष्मीबाई माडग्याळ या महिलेने मुलगी दिव्या (वय २ वर्षे) आणि मुलगा श्रीशैल (वय १ वर्षे) या तिघांचे मृतदेह आज सकाळी विहीरीत आढळून आले.


 काल रात्रीपासून मुलासह महिला बेपत्ता होती. शोधाशोध करीत असताना या तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळून आले. मुलासह महिलेने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या आठवड्यामध्ये बिळूर येथे एका महिलेने आपल्या तेरा व अकरा वर्षाच्या दोन मुलींसह लिंगणून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. 


महिलेने पतीच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे चौकशीत समोर आले होते. पोलीसांनी पतीला अटकही केली आहे. एकाच आठवड्यात पुन्हा तसाच प्रकार सिंदूर येथे घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *