👁 5 Views

६४ लाखांच्या गुटख्यासह २० लाखांचा कंटेनर जप्त

 हाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा परराज्यातून अवैधरित्या विक्रीसाठी नेत असलेल्या कंटेनरसह पाऊण कोटीचा मुद्देमाल जालना पोलीसांनी जप्त केला आहे. या कंटनेरमध्ये 63 लाख 72 हजाराचा गुटखा व 20 लाख रुपये किमतीच्या कंटनेरचा समोवश आहे.


कारवाई 15 ऑक्टोबर रोजी जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ करण्यात आली असून आज सोमवार 17 ऑक्टोबर रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जायभाये यांना गुप्तबातमीदारामाफर्त माहीती मिळाली होती की, कंटेनर क्रं. (एमएच-14-ईएम-9650) मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत गुटख्याची बेकायदेशीर अंबड रोडने वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन सहायक पोलीस निरीक्षक वडते, पोलीस कर्मचारी जारवाल, मुंढे, तालुका वन मोबाइलचे चालक कापसे यांच्यासह रवाना झाले. 


अंबड रोडने जात असतांना पाण्याची टाकी इंदेवाडी येथे संशयीत कंटनेर हे दिसले असता पोलीसांनी गाडीतून खाली उतरुन वाहनचालकास गाडी थांबवण्याचे हातवारे करून इशारे केले असता सदर चालकाने गाडी वेगाने पळवुन नेऊन थोडया अंतरावर थांबवुन गाडी जागेवरच सोडुन देवुन पळुन गेला. सदर चालकाचा पोलीसांनी पाठलाग केला असता. चालकाने अंधाराचा फायदा घेत पळुन जाण्यात यशस्वी झाला.


या कंटेनरची कॅबीन चेक केली असता स्टेअरिंगला चावी तशीच लावलेली होती. सदर गाडीमध्ये प्रतिबंधीत गुटखा किंवा अन्य पदार्थ असण्याची शक्यता असल्याने सदर कंटेनर पर्यायी चालकाव्दारे पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर पुढील कार्यावाहीसाठी अन्न व औषध प्रशासन जालना यांचे बरोबर पत्र व्यवहार केला. 

आज 17 ऑक्टोंबर रोजी अन्न व औषध प्रशासन जालनाचे अन्न व औषध सुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांनी येवुन सदर वाहनामधील मुद्देमालाची पाहणी केली असता एकुण 59 मोदमध्ये 63 लाख 72 हजार रुपयाचा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत गोवा 1000 गुटखा मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला तसेच कंटेनर किंमत अंदाजे 20 लाख रुपये आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *