👁 5 Views

बॉयफ्रेंड समजून 6महिने केले चॅटिंग आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आला धक्कादायक अनुभव

 डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे संपर्क साधणे सोपे झाले झाले आहे. जगाच्या एका कोपऱ्यातील व्यक्ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील व्यक्तीसोबत कोणत्याही वेळी संपर्क करू शकते.

पण या डिजिटल टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. असाच एक धक्कादायक अनुभव एका तरुणीला आला.


डेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणी सहा महिन्यांपासून एका व्यक्तीसोबत बॉयफ्रेंड समजून चॅटिंग करत होती. तरुणीने एक दिवस चॅटिंगमधूनच प्रत्यक्ष भेटीची वेळ आणि ठिकाण ठरविले. ठरल्याप्रमाणे ती भेटण्यासाठी गेली आणि एका धक्कादायक अनुभवाला सामोरी गेली.


ऑस्ट्रेलियातील तरुणीने तिचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तरुणीने जाहीर कबुली पण दिली की, अनोळखी बॉयफ्रेंड सोबत ऑनलाइन पद्धतीने ती सहा महिन्यांपासून रोमँटिक गप्पा मारत होती. दोघांनी न्यूझीलंडधील एका हॉटेलवर भेटण्याचे ठरविले. आतापर्यंत तरुणीला बॉयफ्रेंडसोबतच्या गप्पांची एवढी सवय झाली होती की तिलाही भेटीची ओढ लागली होती. पण प्रत्यक्ष भेट घेताच तरुणीला मोठा धक्का बसला.


याआधी सहा महिन्यांच्या काळात तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडची कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. दोघांचे एकमेकांशी फोनवर पण बोलणे झाले नव्हते. तरुणीने ज्या ज्या वेळी व्हिडीओ कॉल किंवा फोन कॉल करण्याचा विचार बोलून दाखवला त्या प्रत्येकवेळी नवनवे कारण देऊन तिच्या बॉयफ्रेंडने चेहरा किंवा आवाज कळणार नाही याची काळजी घेतली. पण न्यूझीलंडच्या भेटत अखेर बिंग फुटले.


तरुणीला भेटण्यासाठी न्यूझीलंडमध्ये कोणीही तरुण नाही तर एक तरुणीच आली होती. तरुणी बॉयफ्रेंड समजून एका तरुणीलाच ऑनलाइन डेट करत होती. अखेर न राहवून धक्का बसलेल्या तरुणीने त्या ओळख लपविणाऱ्या तरुणीला तिच्या कृतीमागचे कारण विचारले. यावर तिने एक प्रयोग म्हणून अशी कृती केल्याचे सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *