👁 10 Views

दबक्या पावलांनीवाघोबा आला आणि मोरावर झडप घातली

 सोशल मीडियावर असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातही लहान मुलांचे व्हिडीओ  पाककलांचे  व्हिडीओ आणि प्राणी- पक्ष्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते.


यातले काही धडकी भरवणारे असतात तर, काही मनोरंजक. जेव्हा वन्यजीवांच्या व्हिडिओंचा विचार केला जातो, तेव्हा त्यापैकी बहुतेक दृश्य ही शिकारीच्या क्षणांची असतात. असाच एक व्हिडीओ तुमहीची नजर वळवेल इतका रंजक आहे.


व्हिडिओमध्ये वाघ आणि मोर  दिसतोय. आता तुम्ही म्हणाल वाघ आणि मोर, हे काहीही संबंध नसणारे प्राणी इथे एकत्र दिसतायत… कसं बरं? व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे….


दोन मोर शेजारी शेजारी उभे असल्याचं तुम्हीही पाहू शकता. पुढे पण वाघ पंख पसरवणाऱ्या मोराच्या दिशेने झेपावतो. मात्र वाघाने धडक दिल्याने मोर उडून पळून जातात. इथे क्षणाचाही विलंब झाला असता तर मोर वाघाने पकडला असता आणि त्याचा फडशा पाडला असता. पण, तसं झालं नाही. कारण, वाघाची चाहूल लागताच मोरांनी उडून वाघाच्या तावडीतून पळ काढला.


अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ या इंस्टाग्राम  पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत ज्यांना अनेक लाईक्सही आले आहेत. भारताचा राष्ट्रीय प्राणी आपल्या राष्ट्रीय पक्ष्याची शिकार करतो अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *