👁 8 Views

बहिणीला कॉपीची चिट्टी वाटली लव्ह लेटर , भावाने मुलाचा खून

 बिहारमधील भोजपूरमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाची तुकडे करून निर्घृण हत्या करण्यात झाली आहे. सहामाहीच्या परीक्षेत या मुलाने कॉपी करण्यासाठी एक चिट्टी बनवली होती.


चिट्टी एका मुलीच्या बेंच जवळ पडली. ही चिट्टी या मुलीला लव्ह लेटर वाटल्याने या मुलीने तिच्या भावांकडे तक्रार केली. संतापलेल्या भावाने काही नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने या मुलाचा निर्घृण केला.
या मुलाच्य शरीराचे तुकडे रेल्वे रुळावर फेकून देण्यात आले होते. या प्रकरणात नऊ जणांना अटक झालेली असून यातील ४ जण अल्पवयीन आहेत. 


या प्रकरणातील मृत मुलाचे नाव दया कुमार आहे. उदवंतनगर पोलिस स्टेशन परिसरात तो राहतो.

५वीमध्ये शिकणारा दया कुमार १३ वर्षांच्या बहिणीसोबत शाळेत आला होता. 


शाळेत सहामाहीच्या परीक्षा सुरू होत्या. बहिणाला मदत करण्यासाठी दया कुमारने कॉपीची चिट्टी बहिणीकडे फेकली. पण ही चिट्टी दुसऱ्याच मुलीच्या बेंचच्या बाजूला जाऊन पडली. या मुलीला ही चिट्टी म्हणजे लव्ह लेटर आहे, असा गैरसमज झाला. या मुलीने घरी आल्यानंतर याची तक्रार तिच्या भावाला दिली. तिचा भाऊ आणि काही नातेवाईकांनी नंतर या मुलाला बेदम मारहाणी केली आणि तिचा खून केला.


मारहाणीचा हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. सोमवारी एक रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी एका मुलाचा तुटलेला पाय सापडला. त्यानंतर हा प्रकार उघडीला आला. या प्रकरणात पोलिस डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *