लातूर : कातपूर राेडवरील एका बंगल्यावर १२ ऑक्टाेबर राेजी पहाटे आठ ते दहा जणांच्या टाेळीने सशस्त्र दराेडा टाकत २ काेटी २५ लाखांची राेकड आणि ७३ लाखांच्या साेन्याचे दागिने असा तीन काेटींचा मुद्देमाल पळविला हाेता.
उद्याेजक राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर सुरुवातीला एका आरोपीची नजर पडली.
काेट्यवधींची राेकड आणि काही किलाे साेने घरात असल्याचा त्याचा अंदाज हाेता. हा मुद्देमाल लुटण्याची याेजना ताे गेल्या वर्षभरापासून आखत हाेता.
त्याने रेणापूर तालुक्यातील बावची येथील एकाशी चर्चा केली. दरम्यान, या दाेघांनी पुण्यातील एकाशी संपर्क साधला. त्याने मुंबईतील एकाला आणि जालन्यातील एका अट्टल साथीदाराला साेबत घेण्याचे ठरवले.
आठ ते दहा जणांच्या टाेळींचा बंगल्यावर दराेडा टाकण्याचा कट शिजला. ११ ऑक्टाेबरच्या रात्री ही टाेळी लातुरात दाखल झाली.




