👁 7 Views

तब्बल दोन लाख रुपयांचा गुटखा झाला जप्त

 प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती नाशिक आयजींच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने पाठलाग करीत वाहनातून दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला तसेच वाहन जप्त करण्यात ओले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

बर्‍हाणपूर-मुक्ताईनगर मार्गावरील कर्की फाट्याजवळ रविवार, 23 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चार जणाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.गोपनीय माहितीवरून कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यातील बर्‍हाणपूर ते मुक्ताईनगर रोडवर रविवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास एका बोलेरो

 (एम.एच.19.बी.एम.5400) ची तपासणी केल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळल्याने वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष वाहनातून 15 पोते विमल पानमसाला, विमल पानमसाल्याचे लहान पाऊच 22 पोते, व्ही- 1 तंबाखूचे एक पोते


 जप्त करण्यात आले. त्याचे बाजारमूल्य एकूण दोन लाख 13 हजार 600 रुपये इतके आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी चेतन सुभाष झांबरे (बेघर वस्ती, कोथळी), विनायक मनोहर चांदेलकर (जैन बोर्डींग पाठीमागे, बोदवड), अनुप राजेंद्र गोसावी (मुक्ताईनगर),


 विक्की टील्लानी (बर्‍हाणपूर) यांच्याविरोधात विशेष पथकातील एएसआय बशीर गुलाब तडवी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *