भारतातील लग्न म्हटलं की डान्स शिवाय अपूर्ण आहे. मग ती मिरवणूक असो किंवा क वधू-वर, लोकं जोरदार नाचतात.
त्यांच्याकडे पाहिल्यावर असे समजते की, आता ते दिवस राहिले नाही, जेव्हा वधू तिच्या लग्नाच्या दिवशी खिडक्यांमधून लग्नाच्या मिरवणुका पाहत असायची.
पण, आता केवळ वराचे मित्रच नव्हे तर वधूच्या मैत्रिणी लग्नात मनसोक्त नाचतात. वराची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचल्यावर सर्वजण नाचताना दिसतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात भन्नाट नाचताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वधू स्टेजवर भन्नाट नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नवरा शांतपणे उभा आहे आणि वधू जोरदार नाचताना दिसत आहे.
या दरम्यान वराची अवस्था बघायला मिळते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वराची कीवही येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्कीच आनंददायी जाईल
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. दरम्यान, गाणे वाजते आणि वधू-वर स्टेजवर नाचताना दिसतात. वर थोडा वेळ नाचतात, पण वधू थांबण्याचे नाव घेत नाही. ती स्टेजवर भन्नाट स्टेप्स करते.
तिने या दिवसासाठी खूप तयारी केली असावी असे दिसते. एका ठिकाणी वर खुर्ची मागत बसतो पण वधूचे नृत्य सुरूच असते. लोक एकामागून एक स्टेजवर येतात आणि तिच्यावर पैसे उधळतात




