👁 8 Views

काळया मुलीशी लग्न करून पस्तावलो, म्हणत त्यानं बायकोला घराबाहेर काढलं

 गोराही म्हणतो गोरी पाहिजे, काळाही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाव्हणं कुठं जातील काळ्या पोरी’ हे प्रल्हाद शिंदे यांचे प्रसिद्ध गीत आजच्या युगातही तितकंच खरं ठरतंय.


कारण अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 3 वर्षांनी एका पतीने आपल्या पत्नीला घरातून हाकलवून दिलं. तिचा रंग काळा  आहे म्हणून पतीने हे संतापजनक कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर त्यानंतर त्याने एक गोरी मुलगी शोधली आणि तिच्याशी लग्न केलं. 


ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. पश्चिम बंगालच्या  पुरुलिया इथं उघकीस आलेल्या आलेल्या या प्रकराने सगळ्यांनाच धक्का बसलाय.

याप्रकरणी पीडित पत्नीने आपल्या पतीविरोधात लेखी तक्रारही दाखल केली. सध्या या घटनेची पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाते आहे. 


या प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. प्रत्येक मुलाला लग्नासाठी गोरी मुलगी आणायची कुठून, असा प्रश्नही आता काहींनी उपस्थित केलाय.

भारतवर्षचे प्रतिनिधी अजय विद्यार्थी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 3 वर्षांपूर्वी एका दाम्पत्याचं लग्न झालं होतं. पण तीन वर्षांनंतर पतीला वाटलं की आपली पत्नी काळी आहे.


 त्यामुळे आपण तिच्यासोबत नाही राहू शकत. अखेर त्यानं दुसऱ्या एका गोऱ्या मुलीशी लग्न करुन तिला घरी आणलं आणि आपल्या पहिल्या पत्नीला घराबाहेर काढलं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *