👁 7 Views

कर्मयोगीच्या तब्बल ८० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड


   श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सध्या तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या म्हणजेच २०२३-२४ साली पास आऊट होणाऱ्या विविध विभागातील तब्बल ८० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. 


कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर च कार्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्‍या सर्व मूलभूत कौशल्यांचा सखोल अभ्यास करून प्रशिक्षीत केले जाते. 


त्याचाच एक भाग म्हणून झेंसार कंपांनीकडून नोकरीसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जा चे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कर्मयोगीच्या तब्बल ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 


झेंसार प्रा. ली. ही एक सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून या कंपनीकडून विद्यार्थ्यांना एप्टिट्यूड स्किल, सॉफ्ट स्किल, अॅडव्हान्स जावा, टेस्टिंग इत्यादी टेक्निकल स्किल चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी होणार आहे. भविष्यातील कार्पोरेट क्षेत्रातील गरज ओळखून तृतीय वर्षा मधेच विद्यार्थ्यांना  त्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जातेय यामुळे कर्मयोगीमधील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण होण्या आधीच मोठ्या पगारची नोकरी मिळण्याची संख्या प्रचंड आहे.  


 श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक यांनी प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *