👁 5 Views

दारूच्या नशेत वृद्धाने केलं असे काही भयंकर …. क्षणातच सर्व काही संपलं

 

दारूच्या व्यसनाने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केल्याचा घटना नेहमीच समोर येत असतात. 


आता असाच काही प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे.


दारूच्या नशेत एका वृध्द कापुस व्यापाऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केली.

 ही घटना शनिवारी रात्री मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे उघडकीस आली. उत्तम हरी करडे (वय 75) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.


 तर याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम करडे कापसाचा व्यापार करीत होते. 


मात्र त्यांचे वय झाल्याने त्यांची दोन मुले हे व्यापार पहात होते. तर उत्तम करडे हे सध्या घरीच राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन त्यांना दारूचे व्यसन जडले होते. 


त्यामुळे ते सतत नशेत राहत असत. त्यातुनच शनिवारी सायंकाळी त्यांनी घरातील पत्र्याच्या शेड मधील लोखंडी पाईल उपरणे बांधून गळफास घेतला, असल्याचे समोर आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *