👁 7 Views

माणसावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

 

उपराजधानीत गेल्या काही वर्षात बिबट्यांचा वावर वाढला आहे. रविवारी सकाळी जामठा क्रिकेट स्टेडियम जवळ शुअर टेक


 रुग्णालयासमोर बिबट्याने एका व्यक्तीला जखमी केले होते. वनखात्याच्या चमूने अवघ्या काही तासातच त्याला जेरबंद केले.


शहरालगत असलेल्या वनक्षेत्रामुळे गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. 


रविवारी सकाळी शुअरटेक रुग्णालयासमोर अचानक बिबट्याने एका व्यक्तीवर झडप घेतली आणि बिबट जंगलात पळून गेला.


 बिबट्याच्या हल्ल्यात त्या व्यक्तीला हलकी दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. 


हिंगणा पोलीस ठाण्यातून या घटनेची माहिती सेमिनरी हिल्स वरील वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राला देण्यात आली. तातडीने केंद्राची चमू घटनास्थळी पोहचली. त्यांनी जंगलात बिबट्याची शोधमोहीम राबवली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *